Property New Rules : मात्र मुलींना वडिलांच्या संपत्तीत पूर्ण हक्क मिळत नव्हता. म्हणून सरकारने या नियमामध्ये बदल करून, 2005 साली कायद्यात दुरुस्ती करण्यात आली, ज्यामुळे मुलींना मुलांप्रमाणेच मालमत्तेवर समान अधिकार मिळाला. मुलीचे लग्न झाल्यानंतरही तिचा संपत्तीवर अधिकार असेल असा नियम काढण्यात आला .
Property New Rules 1965 आणि 2005 चा कायदा
📢 हे पण वाचा :- डख यांचा नवा अंदाज! पुन्हा या तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार अंदाज पाहिलात का…?
2005 च्या हिंदू उत्तराधिकार कायद्यात दुरुस्ती होण्याआधी अविवाहित मुलींनाच कुटुंबातील सदस्य मानले जात होते. तसेच लग्नानंतर त्यांचा कुटुंबाच्या मालमत्तेवर हक्क संपला असेल मानले जात होते .पण 2005 च्या कायद्यानंतर विवाहित मुलींनाही वडिलांच्या मालमत्तेत पूर्ण अधिकार मिळू लागला. यामुळे मुलींना लग्नानंतरही संपत्तीवरील हक्क अबाधित राहतो.
हा हक्क कोणत्याही वर्षांपर्यंत मर्यादित नाही आणि मुलीला कायमच वडिलांच्या संपत्तीवर वारसाहक्क राहील असे नमूद केले आहे . या बदलामुळे मुलींना त्यांच्या कुटुंबातील संपत्तीवर कायदेशीर अधिकार मिळाला असून, हे बदल भारतात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.