ATM कार्ड असेल तर मृत्यूनंतर मिळतात 10 लाख रुपये, कसे? जाणून घ्या पटापट ATM Card Insurance

ATM Card Insurance नमस्कार आजच्या काळात एटीएम कार्ड हे आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग बनले आहे. आज बहुतेक लोक रोख रक्कम बरोबर ठेवण्याऐवजी एटीएम कार्ड सोबत बाळगतात, ज्यामुळे व्यवहार करणे सोपे होते. एटीएम फक्त पैसे काढण्यासाठीच उपयुक्त नाही त्याद्वारे अनेक इतर सुविधाही मिळतात. पण याबद्दलची संपूर्ण माहिती नसल्यामुळे अनेक लोक या सुविधांचा लाभ घेऊ शकत नाहीत, तर काही वेळा बँकाही त्यांच्या ग्राहकांना ही माहिती पुरवत नाहीत.

जेव्हा एखाद्या ग्राहकाला बँकेकडून एटीएम कार्ड दिले जाते, तेव्हा त्यासोबत अपघात विमा आणि अकाली मृत्यू विमा मिळतो. पण अनेकांना याबाबत माहिती नसल्याने, अपघात किंवा अकाली मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना या विम्याचा लाभ मिळत नाही.

ATM Card Insurance बँकांच्या एटीएम कार्डांवर उपलब्ध विमा फायदे

एटीएम कार्डानुसार ग्राहकाच्या अपघात झाल्यास किंवा अकाली मृत्यू झाल्यास कुटुंबाला विमा मिळतो. बँकेच्या नियमांनुसार, जर एटीएम कार्डधारकाने 45 दिवसांत कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा खासगी बँकेचे एटीएम वापरले असेल, तर कार्डाच्या प्रकारानुसार विम्याची रक्कम दिली जाते.

📢 हे पण वाचा :- आता कोणत्याही हमीशिवाय 3 लाखांचे कर्ज पीएम केंद्राची नवी योजना नक्की आहे तरी काय? 

  • क्लासिक कार्ड : एक लाख रुपयांचा विमा
  • प्लॅटिनम कार्ड : दोन लाख रुपयांचा विमा
  • ऑर्डिनरी मास्टरकार्ड : पन्नास हजार रुपयांचा विमा
  • प्लॅटिनम मास्टरकार्ड : पाच लाख रुपयांपर्यंत विमा
  • व्हिसा कार्ड : लाखापर्यंतचे विमा संरक्षण
  • रुपे कार्ड : एक ते दोन लाख रुपयांचा विमा

ATM Card Insurance विम्याच्या विविध परिस्थिती

जर कार्डधारक अपघातात एका हाताने किंवा पायाने अपंग झाला असेल, तर त्याला 50 हजार रुपयांचा विमा दिला जातो. त्याचप्रमाणे, दोन्ही हात किंवा पाय गमावले असल्यास किंवा मृत्यू झाल्यास, कार्डानुसार 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत विमा दिला जातो.

अकाली मृत्यू झाल्यास, कार्डधारकाचा नॉमिनी संबंधित बँकेच्या शाखेत दाव्यासाठी अर्ज करू शकतो. त्यासाठी एफआयआर प्रत, उपचार प्रमाणपत्र आणि अन्य आवश्यक कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतात. यानंतर काही दिवसांनी, विम्याची रक्कम संबंधित कुटुंबीयांना मिळते.

📢 हे पण वाचा :- BSNL चं गिफ्ट! लॉन्च झाला वर्षभराचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन तुम्ही पहिली का किंमत…?

ATM Card Insurance दावा प्रक्रिया

एटीएम कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला मृत्यू प्रमाणपत्र, एफआयआर प्रत, आश्रितांचे प्रमाणपत्र, आणि मृत व्यक्तीचे प्रमाणपत्र मूळ प्रत स्वरूपात सादर करावी लागते. या सर्व प्रक्रियेनंतर संबंधित कुटुंबीयांना विम्याची रक्कम मिळते.

यामुळे ग्राहकांनी आपल्या एटीएम कार्डासोबत उपलब्ध असलेल्या विमा सुविधांची माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे, ज्यामुळे आवश्यकता भासल्यास योग्य लाभ घेता येईल.

Leave a Comment