Canara Bank FD Scheme : एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा एकच सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव योजना ही सुरक्षित गुंतवणुकीसाठी सर्वोत्कृष्ट आहे. महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक सुरक्षित गुंतवणुकीला विशेष प्राधान्य दाखवतात.
त्यामुळे अलीकडे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. फिक्स डिपॉझिट अर्थातच मुदत ठेव योजनेत महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असून अलीकडे या ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
Canara Bank FD Scheme ची 444 दिवसांची विशेष एफडी योजना
कॅनरा बँक ही एक प्रमुख सरकारी बँक आहे. ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 444 दिवसाच्या एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करते.
📢 हे पण वाचा :- नागरिकांनो सावधान ! घरकुल मिळाले तरी शासन परत घेऊ शकते रक्कम सबसिडीसाठी ही चूक करू नका !
ही बँकेची सर्वात जास्त व्याज ऑफर करणारी एफ डी योजना आहे. या एफ डी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 7.25% या रेटने परतावा दिला जात आहे.
तसेच याच एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.75 टक्के या रेटने परतावा मिळतोय. अर्थातच सिनिअर सिटीजन ग्राहकांना 0.50 % अधिकचे दर लागू आहेत.
SBI Bank FD Scheme 5 लाख गुंतवले तर किती रिटर्न मिळणार
सामान्य ग्राहकांनी जर कॅनरा बँकेच्या 444 दिवसांच्या एफडी योजनेत पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना 7.25% या रेटने मॅच्युरिटी वर अर्थातच 444 दिवसांचा काळ पूर्ण झाल्यानंतर पाच लाख 45 हजार 667 रुपये मिळणार आहेत अर्थातच 45 हजार 667 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.
📢 हे पण वाचा :- BSNL चा हा नवीन रिचार्ज प्लॅन माहितीय का? कमी पैशात हे जबरदस्त फायदे जाणून घ्या प्लॅन व किंमत…?
जर समजा याच एफडी योजनेत सीनियर सिटीजन ग्राहकांनी पाच लाख रुपये गुंतवले तर त्यांना मॅच्युरिटी वर पाच लाख 48 हजार 935 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 48 हजार 935 रुपये हे निव्वळ रिटर्न म्हणून मिळणार आहेत.