नमो शेतकरी योजनेची रक्कम एवढी वाढणार देवेंद्र फडणवीस यांची जाहीर घोषणा…! Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana नमस्कार महाराष्ट्र सरकारने पिएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. या योजनेमुळे पिएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकूण 12000 रुपये मिळतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेतील रकमेचा वाढीव लाभ जाहीर केला आहे.

नमो शेतकरी योजनेतील वाढ

फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी दिली जाणारी 6000 रुपयांची रक्कम वाढवून 9000 रुपये करण्याची घोषणा केली आहे. यामुळे पिएम किसान योजनेच्या समावेशासह शेतकऱ्यांना दरवर्षी 15000 रुपयांचा लाभ मिळणार आहे.

Namo Shetkari Yojana महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 प्रमुख घोषणा

महायुतीने विधानसभा निवडणुकीत जाहीर केलेल्या 10 महत्वाच्या घोषणांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे.

📢 हे पण वाचा :- बँक ऑफ बडोदा कडून मिळेल ₹5 लाख पर्यंत फ्री अप्रूव्ड लोन असे करा अप्लाय लगेच ! 

1) लाडकी बहिण योजना : लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये वाढवून 2100 रुपये देण्याचे वचन.
2) महिला सुरक्षा : 25000 महिलांना पोलीस दलात समाविष्ट करण्याचे आश्वासन.
3) शेतकरी कर्जमाफी : शेतकऱ्यांना कर्जमाफीसह वर्षाला 15000 रुपयांचा सन्मान निधी आणि MSP वर 20% अनुदान देण्याचे वचन.
4) अन्न व निवारा योजना : प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन.
5) वृद्ध पेंशन योजना : वृद्ध पेंशनधारकांना 1500 रुपये वाढवून 2100 रुपये देण्याचे आश्वासन.
6) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिरता : राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन.
7) रोजगार निर्मिती : 25 लाख रोजगार आणि 10 लाख विद्यार्थ्यांना दरमहा 10000 रुपयांचे प्रशिक्षण आणि विद्यावेतन देण्याचे वचन.
8) पांदण रस्ते योजना : ग्रामीण भागातील 45000 गावांत पांदण रस्ते बांधण्याचे वचन.
9) अंगणवाडी आणि आशा सेविका वेतन : अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15000 रुपये वेतन आणि सुरक्षा कवच देण्याचे आश्वासन.
10) वीज बिल कपात आणि अक्षय ऊर्जा : वीज बिलात 30% कपात करणे आणि सौर ऊर्जा प्रोत्साहन देण्याचे वचन.

📢 हे पण वाचा :- या दिवशी येणार PM किसान योजनेचा 19वा हप्ता तारीख आली समोर..?

महायुतीने सरकार स्थापन झाल्यास व्हिजन महाराष्ट्र @2029 या महत्त्वपूर्ण योजनांची 100 दिवसांत अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Comment