PM Kisan Namo Shetkari Yojana मित्रांनो नमस्कार, शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारकडून सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. कारण 5 सप्टेंबरला राज्यातील शेतकऱ्यांना 4000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कोणत्या शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबर ला 4000 रुपये मिळणार ? याची संपूर्ण माहिती समजून घेऊया.
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5 ऑक्टोबरला 4000 रुपये जमा होतील पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी वाशीम जिल्ह्यात दौऱ्यावर असताना या ठिकाणी यावेळी शेतकऱ्यांना दोन योजनेचे पैसे वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे.
पीएम किसान सम्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेचे ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमधील 18 वा आणि 5वा हप्ता हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 05 ऑक्टोबर 2024 वाशिम महाराष्ट्र येथून वितरित केला जाणार आहे.
PM Kisan Namo Shetkari Yojana 2024
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार, यवतमाळ वाशिम चे पालकमंत्री संजय राठोड आणि मान्यवर उपस्थित राहतील अशी माहिती आहे कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि बाबत माहिती दिलेली आहे. आता या ठिकाणी आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजना मधून शेतकऱ्यांना 17 हप्ते देण्यात आले आहेत.
📢 हे पण वाचा :- या राशन कार्ड धारकांना मोफत रेशन सह मिळतात या मोठ्या सुविधा तुम्हाला माहिती का कोणत्या…?
उर्वरित पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या आतापर्यंत 4 हफ्ते देण्यात आले असून 5वा हफ्ता 05 तारखेला वितरित केला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी नक्कीच महत्त्वाची योजना या ठिकाणी आहे, आणि कामाच्या वेळी शेतकऱ्यांना हप्ता मिळतो आहे. त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांच्या हितासाठी हे 4 हजार रुपये नक्कीच असणार आहे.
तुम्हालाही हत्ती मिळतील का हे देखील पाहण्यासारखा आहे. तुम्हाला हप्ते मिळतील की नाही हे तुम्ही पीएम किसान आणि तसेच नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता. तिथे जाऊन तुम्हाला मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर हे दोन पर्याय दिसतील या दोन्ही पर्याय मधून तुम्ही त्या ठिकाणी स्टेटस चेक करू शकता.