PM Vishwakarma Yojana नमस्कार मित्रांनो अनेक तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते, परंतु भांडवलाच्या अभावामुळे ते शक्य होत नाही. याच समस्येवर उपाय म्हणून मोदी सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून इच्छुक तरुणांना आर्थिक मदत मिळू शकते. या योजनेअंतर्गत १५,००० रुपयांपर्यंत मदत देण्यात येते.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ सोनार, लोहार, न्हावी यांसारख्या कौशल्याधारित व्यावसायिकांना मिळू शकतो. एकूण १८ ट्रेडमधील कुशल व्यापार्यांना या योजनेचा फायदा मिळण्याची संधी आहे. यामध्ये लोहार, सोनार, कुंभार, शिल्पकार, गवंडी यांसारख्या व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
या योजनेत ३ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे. पहिल्या टप्प्यात १ लाखांचे कर्ज दिले जाते, आणि व्यवसायाच्या विस्तारासाठी नंतर २ लाखांचे कर्ज दिले जाते. हे कर्ज केवळ ५ टक्के व्याजदराने दिले जाते.
PM Vishwakarma Yojana
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत १८ ट्रेडमधील व्यक्तींना मास्टर ट्रेनर्सकडून प्रशिक्षण दिले जाते. तसेच, प्रशिक्षण कालावधीत रोज ५०० रुपयांचे स्टायपेंडही दिले जाते. या योजनेत कौशल्य वृद्धी, १५,००० रुपयांचे टूलकिट आणि डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहनदेखील दिले जाते.
📢 हे पण वाचा :- लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसे कधी येणार तुमच्या खात्यात इथं पहा तारीख..?
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही आवश्यक अटी आहेत. अर्जदार भारताचा नागरिक असावा, वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे, आणि संबंधित ट्रेडमध्ये प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, आणि रहिवासी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
यामार्फत अनेक तरुण आपली कौशल्ये विकसित करून यशस्वी व्यावसायिक बनू शकतात आणि आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पाऊल उचलू शकतात.